पोस्ट्स

मिपा श्रीगणेश लेखमाला २०२३ - "मी धनंजय माने, आणि हा माझा बायको पार्वती"

इमेज
१) धनंजय माने इथेच राहतात का? ठक ठक... २) माने तुम्ही हरामखोर आहात हो! ३) तुम्ही ते सत्तर रुपये माझ्या औषधासाठी घेतले होते, परत द्या... परत द्या! ४) आनंदी आनंद गडे, जिकडे तिकडे चोहीकडे... ५) त्याच्याबरोबर तुम्ही दिलेले सत्तर रुपये सुद्धा वारले ६) मी धनंजय माने, आणि हा माझा बायको पार्वती ७) देवपूजा झाल्याशिवाय मी कोणाला शिवू देत नाही ८) तुझ्यासाठी निरंजन बाबांकडून प्रसादाचा आंबा आणायला सांगितला होता मी तानूला ९) नवऱ्यानं टाकलंय तिला... १०) लहानपणी मी कोल्हापूरला असताना मुलांच्या बरोबर कुस्त्या खेळायची ११) अगं बया बया बया बया... केवढी मोठी झाली गं तूं १२) लाल धागा बिडी दे रे... जल्दी दे रे देखताए क्या रे १३) डोहाळे लागलेत हो, डोहाळे... गेले दोन दिवस सारखी विड्याचं ओढत्ये १४) कुणीतरी येणारं येणारं गं... १५) जाऊ बाई... नका बाई इतक्यात जाऊ...

।। 'हिंग' पुराण - अध्याय तिसरा ।। (अंतिम)

इमेज
"तडका तो सब लगाते हैं... " 'उमंग' नामक महिलेची नवीन सुनबाई 'निक्की' आपली सासू आणि तिच्या मैत्रिणीसाठी पाणी घेऊन येताना एंड टेबलला अडखळल्याने तिच्या हातातील ट्रे वरच्या ग्लासेस मधलं थोडंसं पाणी तिच्या सासूच्या अंगावर सांडतं. ह्या घटनेची प्रत्यक्षदर्शी साक्षीदार असलेली 'उमंग'ची मैत्रीण स्वयंपाक करता करता आपल्या बंगाली मैत्रिणीला "उमंगने पाणी मागितले तर तिच्या नव्या सुनबाईने ग्लास मधले पाणी तिच्या तोंडावर फेकले" अशी फोडणी देऊन तो प्रसंग कथन करते. हि बंगालन, आपल्या मैत्रिणीला फोन करून त्याच प्रसंगाला अजून फोडणी देऊन "उमंगच्या 'डेंजरस' सुनेने तिने पाणी मागितले तर पाण्याची बादली आणून तिच्या डोक्यावर ओतली " असे सांगते. बंगालन कडून अशी माहिती मिळालेली महिला आणखीन एका महिलेला फोन करून "उमंगने पाणी मागितले तर तिच्या सुनेने तिचे तोंड 'फिश टॅंक' मध्ये बुडवले" अशी अधिकची फोडणी देऊन तिला तो प्रसंग तिला कथन करते. शेवटी, "तडका तो सब लगाते हैं... पर असली तडका सिर्फ कॅच हिंग से लगता हैं! शुद्ध और ज

।। 'हिंग' पुराण - अध्याय दुसरा ।।

इमेज
"अच्छा जल्दी बताओ हिंग को इंग्लिश में क्या बोलते हैं?" २०१३ सालच्या 'क्वीन' (Queen) ह्या हिंदी चित्रपटात अ‍ॅमस्टरडॅम मधल्या इटालियन रेस्टोरंटचा मालक 'मार्सेलो' त्याच्या व्यवसायाला स्पर्धा निर्माण करू पाहणाऱ्या ऑस्ट्रेलियन प्रतिस्पर्ध्यावर मात करण्याच्या उद्देशाने 'रानी' (कंगना रानौत) समोर भारतीय खाद्यपदार्थ तयार करून विकण्याचा आव्हानात्मक प्रस्ताव ठेवतो. मार्सेलोचा प्रस्ताव स्वीकारलेली रानी रेस्टोरंटच्या भटारखान्यात 'हिंग' शोधत असते, पण तिथे कोणालाच हिंग म्हणजे काय हे माहित नसल्याने ती भारतात रात्री ढाराढूर झोपलेल्या आपल्या आईला फोन करून "अच्छा जल्दी बताओ हिंग को इंग्लिश में क्या बोलते हैं?" असा प्रश्न विचारते. त्यावर उत्तर माहिती नसलेली तिची आई हाच प्रश्न आपल्या नवऱ्याला विचारते, पण त्याच्याकडूनही काही उत्तर न मिळाल्याने ती मोबाईल फोनवरून अन्य तीन महिलांची झोपमोड करून त्यांना हा प्रश्न विचारते. त्यांच्यापैकी पहिली महिला "आय थिंक... मस्टर्ड", दुसरी महिला "अरे वो डब्बी पे जो छोटासा लिक्खा होता है, कभी पर पढ

।। 'हिंग' पुराण - अध्याय पहिला ।।

इमेज
मिसेस पोद्दार ने पेश कि बेसनगट्टे कि सब्जी मिसेस मोंगा ने बनाई दाल मखनी मिसेस चॅटर्जी कि बैंगन भाजी मिसेस नायर का सांबार मिसेस गुप्ता का राजमा और मिसेस विरानी का उंधियू वाह! सबको मिलते है दस में से दस... अब चिट निकालके हि होगा मिसेस शेफ का फैसला... इन दस नंबरीयोंने ऐसा क्या डाला कि स्वाद हुवा निराला? घर घर कि पसंद वनदेवी हिंग... स्वाद और सुगंध वनदेवी हींग... चुटकीभर वनदेवी हिंग... खाना बने रेलिशिंग... वरील 'अतुल परचुरेंनी' केलेली वनदेवी हिंगाची जाहिरात आठवते का? कंपनीने आपल्या उत्पादनाची जाहिरात करतानाच उत्तर, दक्षिण, मध्य, पूर्व आणि पश्चिम अशा जवळपास संपूर्ण भारताचे प्रतिनिधित्व करणारी आडनावे वापरून अखिल भारतीय खाद्यसंस्कृतीत होणारा हिंगाचा वापर आणि त्याचे स्वादमूल्यही त्या जाहिरातीतून मोठ्या कल्पकतेने विशद केले होते! खाद्यपदार्थांना स्वादिष्ट बनवणारी खमंग फोडणी तयार करताना तापलेल्या तेलात मोहरी तडतडली कि त्यात घातला जाणारा एक महत्वाचा घटक पदार्थ म्हणून आपणा सर्वांनाच सुपरिचित असलेला 'हिंग' इतिहास संशोधकांच्या मते इ.स. पूर्व सहा

माय नेम इज बॉंड... जेम्स बॉंड!

इमेज
माय नेम इज बॉंड... जेम्स बॉंड मा य नेम इज बॉंड... जेम्स बॉंड , व्होडका मार्टीनी... शेकन... नॉट स्टर्ड , 'डबल ओ सेव्हन' , 'नॉट नॉट सेव्हन' अशी वाक्ये वा शब्द कानावर पडले किंवा 007 हा आकडा पाहिला कि आपल्या डोळ्यांसमोर उभा राहतो 'जेम्स बॉंड' नावाचा एक स्टायलीश, देखणा, रुबाबदार नायक! जगासाठी जरी त्याची ओळख ‘युनिव्हर्सल एक्स्पोर्टस’ नामक कंपनीचा प्रतिनिधी अशी असली तरी प्रत्यक्षात तो असतो, ब्रिटीश सरकारच्या मिलिटरी इंटेलिजन्स अंतर्गत आंतरराष्ट्रीय कारवायांत गुंतलेला विभाग ‘एमआय सिक्स’ (MI6) मध्ये कमांडर ह्या हुद्द्यावर कार्यरत असलेला आणि ‘डबल ओ सेव्हन’ ह्या संकेतनामाने ओळखला जाणारा गुप्तहेर. प्रख्यात ब्रिटिश कादंबरीकार 'इयान फ्लेमिंग' ह्यांच्या लेखणीतून १९५३ साली साकार झालेल्या ‘जेम्स बॉंड’ नामक काल्पनिक पात्राने गेली सहा दशके जगभरातील असंख्य स्त्री / पुरुषांवर अक्षरशः गारुड केले आहे ते त्यांच्या लिखाणापेक्षा त्या पात्रावर आधारित असलेल्या चित्रपटांमुळे. जेम्स बॉंडच्या नवीन चित्रपटाची घोषणा झाली कि लगेच त्यात 'बॉंडची भूमिका को