दुबई : मरूभूमितले नंदनवन - भाग ४
दुबई : मरूभूमितले नंदनवन अनुक्रमणिका भाग – १ भाग – २ भाग – ३ भाग – ४ दिवस चौथा :- सकाळी साडेनऊला उठल्यावर ब्रश करून आधी कॉफीशॉप मध्ये जाऊन नाश्ता करून घेतला. दुपारी तीन वाजता डेझर्ट सफारीसाठी निघायचे असल्याने हाताशी असलेला तीन-चार तासांचा फावला वेळ सत्कारणी लावायला अकराच्या सुमारास तयार होऊन आम्ही खाली उतरलो आणि दोन-अडीच कि.मी. अंतरावरचा दुबईतले एक प्रमुख आकर्षण असलेला सराफ बाजार अर्थात 'दुबई गोल्ड सूक' ला जाण्यासाठी टॅक्सी पकडली. शंभराहून अधिक वर्षांचा इतिहास असलेल्या ह्या सराफ बाजारात सोने, चांदी, प्लॅटिनम, हिरे-माणके, मोती आणि अन्य मौल्यवान रत्ने विकणारी ९०० हुन अधिक दुकाने आहेत. आश्चर्याची गोष्ट म्हणजे कुठल्याही दिवशी १० ते १५ टन सोने विक्रीसाठी उपलब्ध असणाऱ्या ह्या गोल्ड सूक परिसराच्या सुरक्षेसाठी केवळ एक पोलीस व्हॅन तैनात असते, कुठल्याही दुकानाबाहेर एकही बंदूक किंवा दंडुकेधारी सुरक्षा रक्षक दिसणार नाही. सोन्याच्या किमतीत फार काही फरक नसला तरी त्याच्या शुद्धतेबद्दलची खात्री ह