पोस्ट्स

चित्रपट लेबलसह पोस्ट दाखवत आहे

मिपा श्रीगणेश लेखमाला २०२३ - "मी धनंजय माने, आणि हा माझा बायको पार्वती"

इमेज
१) धनंजय माने इथेच राहतात का? ठक ठक... २) माने तुम्ही हरामखोर आहात हो! ३) तुम्ही ते सत्तर रुपये माझ्या औषधासाठी घेतले होते, परत द्या... परत द्या! ४) आनंदी आनंद गडे, जिकडे तिकडे चोहीकडे... ५) त्याच्याबरोबर तुम्ही दिलेले सत्तर रुपये सुद्धा वारले ६) मी धनंजय माने, आणि हा माझा बायको पार्वती ७) देवपूजा झाल्याशिवाय मी कोणाला शिवू देत नाही ८) तुझ्यासाठी निरंजन बाबांकडून प्रसादाचा आंबा आणायला सांगितला होता मी तानूला ९) नवऱ्यानं टाकलंय तिला... १०) लहानपणी मी कोल्हापूरला असताना मुलांच्या बरोबर कुस्त्या खेळायची ११) अगं बया बया बया बया... केवढी मोठी झाली गं तूं १२) लाल धागा बिडी दे रे... जल्दी दे रे देखताए क्या रे १३) डोहाळे लागलेत हो, डोहाळे... गेले दोन दिवस सारखी विड्याचं ओढत्ये १४) कुणीतरी येणारं येणारं गं... १५) जाऊ बाई... नका बाई इतक्यात जाऊ...

माय नेम इज बॉंड... जेम्स बॉंड!

इमेज
माय नेम इज बॉंड... जेम्स बॉंड मा य नेम इज बॉंड... जेम्स बॉंड , व्होडका मार्टीनी... शेकन... नॉट स्टर्ड , 'डबल ओ सेव्हन' , 'नॉट नॉट सेव्हन' अशी वाक्ये वा शब्द कानावर पडले किंवा 007 हा आकडा पाहिला कि आपल्या डोळ्यांसमोर उभा राहतो 'जेम्स बॉंड' नावाचा एक स्टायलीश, देखणा, रुबाबदार नायक! जगासाठी जरी त्याची ओळख ‘युनिव्हर्सल एक्स्पोर्टस’ नामक कंपनीचा प्रतिनिधी अशी असली तरी प्रत्यक्षात तो असतो, ब्रिटीश सरकारच्या मिलिटरी इंटेलिजन्स अंतर्गत आंतरराष्ट्रीय कारवायांत गुंतलेला विभाग ‘एमआय सिक्स’ (MI6) मध्ये कमांडर ह्या हुद्द्यावर कार्यरत असलेला आणि ‘डबल ओ सेव्हन’ ह्या संकेतनामाने ओळखला जाणारा गुप्तहेर. प्रख्यात ब्रिटिश कादंबरीकार 'इयान फ्लेमिंग' ह्यांच्या लेखणीतून १९५३ साली साकार झालेल्या ‘जेम्स बॉंड’ नामक काल्पनिक पात्राने गेली सहा दशके जगभरातील असंख्य स्त्री / पुरुषांवर अक्षरशः गारुड केले आहे ते त्यांच्या लिखाणापेक्षा त्या पात्रावर आधारित असलेल्या चित्रपटांमुळे. जेम्स बॉंडच्या नवीन चित्रपटाची घोषणा झाली कि लगेच त्यात 'बॉंडची भूमिका को