पोस्ट्स

James Bond लेबलसह पोस्ट दाखवत आहे

माय नेम इज बॉंड... जेम्स बॉंड!

इमेज
माय नेम इज बॉंड... जेम्स बॉंड मा य नेम इज बॉंड... जेम्स बॉंड , व्होडका मार्टीनी... शेकन... नॉट स्टर्ड , 'डबल ओ सेव्हन' , 'नॉट नॉट सेव्हन' अशी वाक्ये वा शब्द कानावर पडले किंवा 007 हा आकडा पाहिला कि आपल्या डोळ्यांसमोर उभा राहतो 'जेम्स बॉंड' नावाचा एक स्टायलीश, देखणा, रुबाबदार नायक! जगासाठी जरी त्याची ओळख ‘युनिव्हर्सल एक्स्पोर्टस’ नामक कंपनीचा प्रतिनिधी अशी असली तरी प्रत्यक्षात तो असतो, ब्रिटीश सरकारच्या मिलिटरी इंटेलिजन्स अंतर्गत आंतरराष्ट्रीय कारवायांत गुंतलेला विभाग ‘एमआय सिक्स’ (MI6) मध्ये कमांडर ह्या हुद्द्यावर कार्यरत असलेला आणि ‘डबल ओ सेव्हन’ ह्या संकेतनामाने ओळखला जाणारा गुप्तहेर. प्रख्यात ब्रिटिश कादंबरीकार 'इयान फ्लेमिंग' ह्यांच्या लेखणीतून १९५३ साली साकार झालेल्या ‘जेम्स बॉंड’ नामक काल्पनिक पात्राने गेली सहा दशके जगभरातील असंख्य स्त्री / पुरुषांवर अक्षरशः गारुड केले आहे ते त्यांच्या लिखाणापेक्षा त्या पात्रावर आधारित असलेल्या चित्रपटांमुळे. जेम्स बॉंडच्या नवीन चित्रपटाची घोषणा झाली कि लगेच त्यात 'बॉंडची भूमिका को