इजिप्त सोलोट्रीप: एक अविस्मरणीय अनुभव. भाग – ८
इजिप्त सोलोट्रीप: एक अविस्मरणीय अनुभव अनुक्रमणिका भाग – १ भाग – २ भाग – ३ भाग – ४ भाग – ५ भाग – ६ भाग – ७ भाग – ८ भाग – ९ भाग–१० भाग–११ भाग–१२. सात वाजता अलार्म वाजल्यावर उठून, उद्या सकाळी लुक्झोर साठी निघायचे असल्याने पूर्वतयारी म्हणून रुममध्ये अस्ताव्यस्त पसरलेल्या सामानाची आवरा-आवर करायला घेतली. पुढच्या प्रवासात लागणाऱ्या व न लागणाऱ्या वस्तू आणि कपड्यांची विभागणी करून वेगवेगळ्या बॅग्ज भरून सज्ज केल्यावर मग तयारी करून आठ पाचला वरती नाश्ता करण्यासाठी गेलो. हसतमुख जोसेफने नाश्ता आणि दुधाचा चहा आणून दिला. चारपाच टेबल्सवर पर्यटक कुटुंबे बसली असल्याने आणि मला पण लवकर निघायचे असल्याने त्याची इच्छा असूनही आज फार काही बोलता नाही आले. खाणे चालू असताना मुस्ताफाचा तो खाली येऊन उभा असल्याचे सांगायला फोन आला. भरपेट नाश्ता झाल्यावर खाली उतरून साडे आठला म