पोस्ट्स

एप्रिल, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

कॅवलरी टँक म्युझियम (रणगाडा संग्रहालय) - अहमदनगर

इमेज
१६ एप्रिल २०२२ रोजी अहमदनगर शहरातील आशिया खंडातील पहिले (आणि बहुतेक एकमेव) अशी ख्याती असलेले “कॅवलरी टँक म्युझियम” अर्थात ‘रणगाडा संग्रहालय’ पहाण्याचा योग आला. अहमदनगर - सोलापूर रस्त्यावर शहराच्या ‘इवळे’ परीसरात प्रचंड मोठे क्षेत्रफळ व्यापणाऱ्या ह्या रणगाडा संग्रहालयाच्या प्रवेशाच्या कमानीच्या दोन्ही बाजुंना भारतीय बनावटीचे ‘विजयंता’ रणगाडे ठेवले आहेत. गमतीची गोष्ट म्हणजे भर रस्त्यात, उघड्यावर ठेवलेल्या ह्या रणगाड्यांचे आणि कमानीचे फोटो काढण्यास मनाई आहे. कमानी जवळ तैनात असलेल्या जवाना कडील रजीस्टर मध्ये आपले नाव, गाव, फोन नंबरची नोंद केल्यावर तिथुन सुमारे दिड ते दोन की.मी. अंतरावर असलेल्या संग्रहालयाकडे जाण्याचा आपला मार्ग खुला होतो. आतल्या रस्त्याच्या दुतर्फाही वेगवेगळ्या बनावटीचे रणगाडे ठेवले आहेत. त्यापैकी काही रणगाड्यांची चालत्या गाडीतून टिपलेली छायाचित्रे- पार्किंग जवळ ठेवलेला ‘टोपाझ’ (Topaz) रणगाडा शक्तीशाली इंजिन, २० सैनीक वाहुन नेण्याचा क्षमता, ३६० अंशातून बाहेर लक्ष ठेवण्याची सोय असलेला आणि जमीनीवरून तसेच पाण्यातुनही जाऊ शकणारा अशी अनेक वैशिष्ट्ये असण