पोस्ट्स

ऑक्टोबर, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

दुबई : मरूभूमितले नंदनवन - भाग ४

इमेज
दुबई : मरूभूमितले नंदनवन अनुक्रमणिका भाग – १ भाग – २ भाग – ३ भाग – ४ दिवस चौथा :- सकाळी साडेनऊला उठल्यावर ब्रश करून आधी कॉफीशॉप मध्ये जाऊन नाश्ता करून घेतला. दुपारी तीन वाजता डेझर्ट सफारीसाठी निघायचे असल्याने हाताशी असलेला तीन-चार तासांचा फावला वेळ सत्कारणी लावायला अकराच्या सुमारास तयार होऊन आम्ही खाली उतरलो आणि दोन-अडीच कि.मी. अंतरावरचा दुबईतले एक प्रमुख आकर्षण असलेला सराफ बाजार अर्थात 'दुबई गोल्ड सूक' ला जाण्यासाठी टॅक्सी पकडली. शंभराहून अधिक वर्षांचा इतिहास असलेल्या ह्या सराफ बाजारात सोने, चांदी, प्लॅटिनम, हिरे-माणके, मोती आणि अन्य मौल्यवान रत्ने विकणारी ९०० हुन अधिक दुकाने आहेत. आश्चर्याची गोष्ट म्हणजे कुठल्याही दिवशी १० ते १५ टन सोने विक्रीसाठी उपलब्ध असणाऱ्या ह्या गोल्ड सूक परिसराच्या सुरक्षेसाठी केवळ एक पोलीस व्हॅन तैनात असते, कुठल्याही दुकानाबाहेर एकही बंदूक किंवा दंडुकेधारी सुरक्षा रक्षक दिसणार नाही. सोन्याच्या किमतीत फार काही फरक नसला तरी त्याच्या शुद्धतेबद्दलची खात्री ह

दुबई : मरूभूमितले नंदनवन - भाग ३

इमेज
दुबई : मरूभूमितले नंदनवन अनुक्रमणिका भाग – १ भाग – २ भाग – ३ भाग – ४ दिवस तिसरा :- सकाळी उठून सर्व तयारी झाल्यावर ब्रेकफास्ट उरकून नऊच्या काही मिनिटे आधीच आम्ही रिसेप्शन हॉलमध्ये गाडीची वाट बघत बसलो होतो. आज आम्ही वेळेपूर्वी तयार होतो तर गाडी थोड्या उशिराने आली. आजची आमची 'पाम जुमेरा आयलंड्स' आणि उद्याची 'डेझर्ट सफारी' अशा दोन्ही टूर्स सीट इन कोच तत्वावर असल्याने आमच्या बरोबर गाडीत अन्य चार पर्यटकही असणार होते. आधीच्या दोन हॉटेल्स मधून कॅनडाहुन हनिमूनसाठी आलेले एक नवविवाहित शीख जोडपे आणि लंडनहून आपल्या ८-९ वर्षाच्या मुलीबरोबर आलेली एक महिला अशा चार व्यक्तींना पिकअप करून सव्वानऊच्या सुमारास मर्सिडीज-बेंझ स्प्रिंटर टूरर हि ९ आसनी व्हॅन घेऊन रमीझ नावाचा ड्रायव्हर आला. आम्ही गाडीत बसल्यावर पाम जुमेरा आयलंड्स वरच्या 'अटलांटीस - द पाम' हॉटेलपर्यंतचा आमचा सुमारे ३६ कि.मी. अंतराचा प्रवास सुरु झाला. गाडीत शेवटच्या तिसऱ्या रांगेतील सीट्सवर बसलेल्या 'सिंग' आणि 'क