इजिप्त सोलोट्रीप: एक अविस्मरणीय अनुभव. भाग – ९
इजिप्त सोलोट्रीप: एक अविस्मरणीय अनुभव अनुक्रमणिका भाग – १ भाग – २ भाग – ३ भाग – ४ भाग – ५ भाग – ६ भाग – ७ भाग – ८ भाग – ९ भाग–१० भाग–११ भाग–१२. हॉटेलच्या खालच्या रस्त्यावरून जाणाऱ्या जीपवर लावलेल्या भोंग्यावरून दिल्या जाणाऱ्या घोषणांच्या आवाजाने सकाळी अलार्म वाजायच्या थोडी आधीच जाग आली. उठून बघितलं तर, शाळकरी विद्यार्थ्यांची भली मोठी स्पर्धात्मक रॅली चालली होती. सामानाची आवरा आवर कालच करून ठेवली असल्याने फार काही काम नव्हते म्हणून थोडावेळ टी.व्ही. वरचे चॅनेल सर्फ करत वेळ काढला आणि तयारीला लागलो. बरोब्बर आठ वाजता रुफ-टॉप रेस्टॉरंट मध्ये पोचलो. आज जोसेफची साप्ताहिक सुट्टी असल्याने दुसऱ्याच एका थोड्या वयस्कर व्यक्तीने आणून दिलेला नाश्ता झाल्यावर परत रुममध्ये आलो. सामान बेल-बॉयच्या ताब्यात देऊन रिसेप्शन काउंटर गाठले आणि चेक आउट करून आठ पस्तीसला आय