पोस्ट्स

दुबई : मरूभूमितले नंदनवन - भाग १

इमेज
दुबई : मरूभूमितले नंदनवन अनुक्रमणिका भाग – १ भाग – २ भाग – ३ भाग – ४ दुबई : मरूभूमितले नंदनवन - भाग १ पूर्वतयारी :- दोन एप्रिल हा आमच्या लग्नाचा वाढदिवस. तो दिवस मध्यवर्ती ठेऊन पर्यटनाला जाण्यासाठी मला सुट्ट्यांचा काही प्रॉब्लेम नव्हता पण बायकोला काही कार्यालयीन जवाबदाऱ्यांमुळे ३१ मार्च ते ४ एप्रिल असे एकूण पाचच दिवस सलग सुट्टी मिळणे त्यावेळी शक्य होते. पाच दिवसात पर्यटनाच्या नावाखाली प्रवाशांची प्रचंड दमछाक करत एका किंवा दोन-तीन शेजारी देशांमधली ठराविक आकर्षणे दाखवून आणणाऱ्या पॅकेज टूर्सचे पर्याय जगभर उपलब्ध असतात, परंतु 'Package Tour' पेक्षा 'Leisure Travel' आम्हाला आवडत असल्याने फार लांबचा प्रवास पण नाही आणि एंजॉय करता येण्यासारख्या अनेक ठिकाणांमधून आपल्या आवडीनुसार निवड करण्याचे बरेच पर्याय उपलब्ध असल्याने दुबईला जाण्याचे ठरले आणि नेहमीप्रमाणे स्वतःच टूरचे नियोजन करायला घेतले. शारजाला राहणाऱ्या एका मित्राकडून कानू ट्रॅव्हल (Kanoo Travel) नावाची कंपनी संपूर्ण युएई मध

इजिप्त सोलोट्रीप: एक अविस्मरणीय अनुभव. भाग – १२

इमेज
इजिप्त सोलोट्रीप: एक अविस्मरणीय अनुभव अनुक्रमणिका भाग – १ भाग – २ भाग – ३ भाग – ४ भाग – ५ भाग – ६ भाग – ७ भाग – ८ भाग – ९ भाग–१० भाग–११ भाग–१२. सकाळी सात वाजता उठून आवरल्यावर बेल बॉय च्या हातात सामान सोपवून सात पन्नासला खाली येऊन चहा पिण्यासाठी इनहाउस रेस्टॉरंट मध्ये शिरलो. पाचेक मिनिटांत खालिद ब्रेड घेऊन येईलच तेव्हा ब्रेकफास्ट करूनच निघा असे हमादाने सुचवले पण साडेआठची बस असल्याने तिथेच बसून नाश्ता करणे शक्य नसल्याचे सांगितल्यावर त्याने तो पार्सल देण्याची तयारी दर्शवली. आठ वाजता मोहम्मद आणि खालिद एकाचवेळी हॉटेलवर पोचले. हमादाने पार्सल दिलेला ब्रेकफास्ट बॉक्स घेउन आम्ही ‘गो बस’ च्या ऑफिसला जायला निघालो. दहा मिनिटांत त्याठिकाणी पोचलो आणि सामान बसच्या साईड डिकी मध्ये ठेऊन मोहम्मदचा निरोप घेतला आणि माझ्या सीट वर येऊन बसलो. बस छान होती, लांब ला