पोस्ट्स

इजिप्त सोलोट्रीप: एक अविस्मरणीय अनुभव. भाग – १०

इमेज
इजिप्त सोलोट्रीप: एक अविस्मरणीय अनुभव अनुक्रमणिका भाग – १ भाग – २ भाग – ३ भाग – ४ भाग – ५ भाग – ६ भाग – ७ भाग – ८ भाग – ९ भाग–१० भाग–११ भाग–१२. रात्री लवकर झोपलो असल्याने सकाळी जाग पण लवकरच आली. फोन वर वेळ बघितली तर सात वीस झाले होते. आज फक्त आरामच करायचा असल्याने एवढ्या लवकर उठून काय करायचे म्हणून परत झोपायचा थोडा प्रयत्न केला, पण झोप काही लागली नाही. ह्या हॉटेलमध्ये पण ब्रेकफास्ट सकाळी आठलाच सुरु होत असल्याने सव्वा आठला तळमजल्यावर असलेल्या इन-हाउस रेस्टॉरंट मध्ये पोचलो. हमादा नावाचा एक आफ्रिकन वंशाचा तरुण आणि त्याच्या मदतीला दुपारचं कॉलेज सांभाळून सकाळ-संध्याकाळ इथे पार्ट टाईम नोकरी करणारा खालिद नावाचा मुलगा ह्या रेस्टॉरंटची व्यवस्था बघत होते. हमादाने आणलेला नाश्ता करत असताना खालिद शेजारी उभा राहून माझ्याशी गप्पा मारत होता. किती दिवस मुक्काम