इजिप्त सोलोट्रीप: एक अविस्मरणीय अनुभव. भाग – ३
इजिप्त सोलोट्रीप: एक अविस्मरणीय अनुभव अनुक्रमणिका भाग – १ भाग – २ भाग – ३ भाग – ४ भाग – ५ भाग – ६ भाग – ७ भाग – ८ भाग – ९ भाग–१० भाग–११ भाग–१२. रात्री झोपताना सकाळी ७:०० चा अलार्म लावला होता. पण हॉटेलच्या अगदी जवळ असलेल्या व रुमच्या बाल्कनीतून समोरच दिसणाऱ्या चर्चच्या घंटानादाने सकाळी ६:०० वाजताच झोपमोड झाली. अजून थोडावेळ झोपायचा प्रयत्न केला पण तो सपशेल अयशस्वी ठरला, नुसतं लोळत पडण्याचा पण कंटाळा आला तसा उठून बाल्कनीत जाण्यासाठी दरवाजा उघडला, बाहेर गारठा एवढा होता कि प्रतिक्षिप्त क्रियेने ज्या वेगात तो उघडला त्याच्या दुप्पट वेगात परत बंद केला. फोनच्या स्क्रीनवर बघितलं तर ॲक्युवेदर कैरोचं तापमान १०º C आणि रियल फील १२º C दाखवत होतं. साडेसहा वाजले होते. आयता चहा मिळण्यासाठी सात पर्यंत थांबावे लागले असते म्हणून ब्रश करून पँट्रि मध्ये गेलो आणि स्वत