पोस्ट्स

इजिप्त सोलोट्रीप: एक अविस्मरणीय अनुभव. भाग – ३

इमेज
इजिप्त सोलोट्रीप: एक अविस्मरणीय अनुभव अनुक्रमणिका भाग – १ भाग – २ भाग – ३ भाग – ४ भाग – ५ भाग – ६ भाग – ७ भाग – ८ भाग – ९ भाग–१० भाग–११ भाग–१२. रात्री झोपताना सकाळी ७:०० चा अलार्म लावला होता. पण हॉटेलच्या अगदी जवळ असलेल्या व रुमच्या बाल्कनीतून समोरच दिसणाऱ्या चर्चच्या घंटानादाने सकाळी ६:०० वाजताच झोपमोड झाली. अजून थोडावेळ झोपायचा प्रयत्न केला पण तो सपशेल अयशस्वी ठरला, नुसतं लोळत पडण्याचा पण कंटाळा आला तसा उठून बाल्कनीत जाण्यासाठी दरवाजा उघडला, बाहेर गारठा एवढा होता कि प्रतिक्षिप्त क्रियेने ज्या वेगात तो उघडला त्याच्या दुप्पट वेगात परत बंद केला. फोनच्या स्क्रीनवर बघितलं तर ॲक्युवेदर कैरोचं तापमान १०º C आणि रियल फील १२º C दाखवत होतं. साडेसहा वाजले होते. आयता चहा मिळण्यासाठी सात पर्यंत थांबावे लागले असते म्हणून ब्रश करून पँट्रि मध्ये गेलो आणि स्वत

इजिप्त सोलोट्रीप: एक अविस्मरणीय अनुभव. भाग – २

इमेज
इजिप्त सोलोट्रीप: एक अविस्मरणीय अनुभव अनुक्रमणिका भाग – १ भाग – २ भाग – ३ भाग – ४ भाग – ५ भाग – ६ भाग – ७ भाग – ८ भाग – ९ भाग–१० भाग–११ भाग–१२. मुंबईहून आपल्या निर्धारित वेळेपेक्षा २० मिनिटे उशिरा विमानाने उड्डाण करूनही कैरोला मात्र अचूक वेळेवर म्हणजे तिथल्या स्थानिक वेळेनुसार सकाळी ६:०५ ला पोहोचवले. फ्लाईट ड्युरेशन सहा तास पंचेचाळीस मिनिटांची होती. प्रवास छान झाला, ईजिप्त एअर ची सेवा समाधानकारक होती. खाद्यपदार्थ दर्जेदार होते. लिकर सर्व्ह केली जात नव्हती पण एअर होस्टेस आणि फ्लाईट पर्सर ज्युसेस आणि शीत पेयांचा सातत्याने रतीब घालत होते. इन फ्लाईट एन्टरटेनमेन्ट रटाळ होती पण अधून मधून स्क्रीन वर जी.पी.एस. द्वारे नकाशावर दाखवला जाणारा विमानाचा मार्ग, त्याचा वेग, खाली असलेला देश व त्यातील शहरे, एकूण प्रवासाचे अंतर, मुंबई पासून पार केलेले अंतर, कैरो प