पोस्ट्स

ऑगस्ट, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

।। 'हिंग' पुराण - अध्याय तिसरा ।। (अंतिम)

इमेज
"तडका तो सब लगाते हैं... " 'उमंग' नामक महिलेची नवीन सुनबाई 'निक्की' आपली सासू आणि तिच्या मैत्रिणीसाठी पाणी घेऊन येताना एंड टेबलला अडखळल्याने तिच्या हातातील ट्रे वरच्या ग्लासेस मधलं थोडंसं पाणी तिच्या सासूच्या अंगावर सांडतं. ह्या घटनेची प्रत्यक्षदर्शी साक्षीदार असलेली 'उमंग'ची मैत्रीण स्वयंपाक करता करता आपल्या बंगाली मैत्रिणीला "उमंगने पाणी मागितले तर तिच्या नव्या सुनबाईने ग्लास मधले पाणी तिच्या तोंडावर फेकले" अशी फोडणी देऊन तो प्रसंग कथन करते. हि बंगालन, आपल्या मैत्रिणीला फोन करून त्याच प्रसंगाला अजून फोडणी देऊन "उमंगच्या 'डेंजरस' सुनेने तिने पाणी मागितले तर पाण्याची बादली आणून तिच्या डोक्यावर ओतली " असे सांगते. बंगालन कडून अशी माहिती मिळालेली महिला आणखीन एका महिलेला फोन करून "उमंगने पाणी मागितले तर तिच्या सुनेने तिचे तोंड 'फिश टॅंक' मध्ये बुडवले" अशी अधिकची फोडणी देऊन तिला तो प्रसंग तिला कथन करते. शेवटी, "तडका तो सब लगाते हैं... पर असली तडका सिर्फ कॅच हिंग से लगता हैं! शुद्ध और ज