दुबई : मरूभूमितले नंदनवन - भाग २
दुबई : मरूभूमितले नंदनवन अनुक्रमणिका भाग – १ भाग – २ भाग – ३ भाग – ४ दिवस दुसरा :- सकाळी साडेसातला उठून आवरल्यावर साडे आठला नाश्ता करण्यासाठी आम्ही खाली उतरलो. बुफे ब्रेकफास्टची व्यवस्था तळमजल्यावरच्या मलबारी व्यवस्थापन असलेल्या कॉफीशॉप मध्ये होती. तिथे ब्रेड, बटर, चीज, उकडलेली अंडी, ताजी फळे, सलाड, ज्यूस, चहा-कॉफी, दुध, कॉर्न फ्लेक्स, डोनट्स, पेस्ट्रीज अशा रोजच्या ठराविक पदार्थां व्यतिरिक्त उपमा, इडली फ्राय, इडली/मेदुवडा-सांबार, उत्तपा, मसाला डोसा, छोले भटुरे असे चविष्ट भारतीय पदार्थही आलटून पालटून खायला मिळत होते. एकदिवस तर आपल्या सर्वांची आवडती मिसळही होती. पण उसळ मात्र सुरवा सारखी आणि अत्यंत अळणी असल्याने मिसळीची चव आम्हाला अजिबात आवडली नसली तरी भारतभरात टाटा ग्रुपच्या 'जिंजर' ह्या हॉटेल शृंखलेत बुफे ब्रेकफास्टच्या मेनूत फार पूर्वीच हक्काचे स्थान मिळवलेला हा मराठमोळा पदार्थ आंतरराष्ट्रीय पातळीवर पोचल्याचे पाहून आनंद झाला होता. एकदा फिरायला बाहेर पडल्यावर दुपारचे जेवण किती वाजता होईल