इजिप्त सोलोट्रीप: एक अविस्मरणीय अनुभव. भाग – ४
इजिप्त सोलोट्रीप: एक अविस्मरणीय अनुभव अनुक्रमणिका भाग – १ भाग – २ भाग – ३ भाग – ४ भाग – ५ भाग – ६ भाग – ७ भाग – ८ भाग – ९ भाग–१० भाग–११ भाग–१२. सकाळी ६:०० वाजता जाग तर आली, पण ती नक्की कशामुळे आली हे सांगणे अवघड आहे, कारण तेव्हा साईड टेबलवर ठेवलेल्या फोनचा अलार्म आणि चर्चची घंटा दोन्ही एकाचवेळी वाजत होते. थंडी चांगलीच होती. उबदार रजई मधून बाहेर पडायची इच्छा होत नसली तरी उठणे भाग होते. ब्रश करून कालच्याप्रमाणेच स्वतःच चहा बनवून आणला. मग आरामात तयारी करून ६:५० ला रूम मधून बाहेर पडलो. रिसेप्शनमध्ये मेहमूद एका व्यक्तीशी बोलत बसला होता, ती व्यक्ती म्हणजे माझ्या आजच्या अलेक्झांड्रीया टूर साठीचा ड्रायव्हर ‘मोहम्मद’ होता. ईजिप्त मध्ये भेटणाऱ्या १० पुरुषांमधले ढोबळमानाने ४ पुरुष ‘मोहम्मद’, २ ‘अहमद’, १ ‘मेहमूद’ १ ‘मुस्तफा’, आणि १ खालिद, हमादा, हुसेन, आ